हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ज्या लोकांच्या कुंडलीत शनि (Lord Shani) अशुभ स्थितीत असतो, त्यांना जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी हे लोक वेगवेगळे उपाय करत असतात. हिंदू धर्मानुसार शनिवारी शनिदेवाची (Lord Shani) पूजा केल्याने ते प्रसन्न होतात. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी असेच काही खास उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ते खालीलप्रमाणे :
हनुमानाची पूजा
शनिदेवाला (Lord Shani) प्रसन्न करायचे असेल तर सूर्यास्तानंतर शनिवारी हनुमानाची पूजा करा. हनुमानजींच्या पूजेमध्ये सिंदूर ठेवला जातो आणि आरतीसाठी काळ्या तिळाच्या तेलाचा दिवा लावला जातो. पूजेत निळे फुले अर्पण करणे देखील शुभ मानले जाते.
शनि यंत्राची स्थापना करा
शनिदेवाच्या (Lord Shani) प्रकोपामुळे जीवन संकटांनी घेरले असेल तर शनिवारी शनियंत्राची स्थापना करून त्याची मनोभावे पूजा करावी. या यंत्राची दररोज पूर्ण विधीपूर्वक पूजा करावी. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात.
काळ्या हरभऱ्याचा नैवेद्य
पूजेच्या एक दिवस आधी तीन भांड्यांमध्ये 1.25 किलो काळे हरभरे वेगळे भिजवा. दुसऱ्या दिवशी आंघोळीनंतर ते काळे हरभरे विधिनुसार शनिदेवाच्या पूजेत वापरावेत. पूजेनंतर प्रथम काही हरभरे म्हशीला खायला द्यावेत. उर्वरित कुष्ठरुग्णांना वाटण्यात यावे. त्याचबरोबर काही हरभरे घरापासून दूर अशा ठिकाणी ठेवावे ज्या ठिकाणी कोण येत जात नाही.
काळ्या गायीची सेवा करावी
शनिदेवाला (Lord Shani) प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे गायीची सेवा करणे. काळ्या गाईची सेवा केल्याने शनिदेव प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. गायीच्या शिंगावर कलावा बांधून तिची पूजा करावी. यानंतर गायीभोवती फिरून तिला चार चमचे बुंदी खायला द्यावी.
(सूचना : वरील दिलेली माहिती वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. हॅलो महाराष्ट्र वरील कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही.)
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???