तुम्ही देखील रेल्वेत मिळणारा चहा पिता का? तर हा धक्कादायक व्हिडिओ नक्की पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपण आजवर कित्येक वेळा भारतीय रेल्वेतून प्रवास केला असेल. अनेकवेळा हा प्रवास एक दोन तासांचा नव्हे तर दोन-चार दिवसांचा देखील केला असेल. खरे तर कधीही आपण रेल्वेच्या प्रवास करीत असताना, काही वैफट गोष्टी खाण्याऐवजी चहा पिण्यावर जास्त भर देतो. अनेकांना तर रेल्वेत मिळणारा चहा सर्वात जास्त आवडतो. परंतु तुम्हाला हे माहित आहे का रेल्वेमध्ये विकला जाणारा चहा कसा बनवला जातो. सध्या सोशल मीडियावर रेल्वे चहा बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रेल्वेमध्ये चहा कसा बनवला जातो हे दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोन रेल्वे कर्मचारी ट्रेनच्या डब्यामध्ये चहा तयार करीत आहेत. ते एका किटलीमध्ये दूध गरम करत आहेत, हे दूध ते वॉटर बॉयलरच्या मदतीने गरम करत आहेत. परंतु या दरम्यानच कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीला पाहिल्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला. मात्र जेवढा व्हिडिओ शूट झाला आहे त्यामध्ये हे स्पष्ट दिसत आहे की रेल्वेतील कर्मचारी वॉटर बॉयलरने दूध गरम करत आहेत. सध्या यावरच नेटकरी संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ झाल्यापासून यावर अनेक वेगवेगळया प्रतिक्रीया आल्या आहेत. तसेच, इथून पुढे कधी ही रेल्वेतील चहा पिणार नाही, असे म्हणले आहे. आजवर अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यात, रेल्वेतील जेवण देखील नीट बनवत नसल्याचे समोर आले आहे. आता पुन्हा एकदा रेल्वेतील चहाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.