हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या पैकी प्रत्येकालाच कधी ना कधी अँसिडिटीचा (Acidity) त्रास होतो. अनेकांनाचा आपल्या आहाराचे नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे, तर अनेकदा आंबट किंवा अँसिडिटी वर्धक पदार्थ खाल्यामुळे, कधी कधी रात्रीच्या जागरणामुळे अँसिडिटीचा त्रास अनेकांना होतोच होतो. परंतु ह्यावर उपाय नेमका काय करावा हे अनेकांना समजत नाही. त्यासाठी लोक नाही नाही ते उपाय करतात. आणि पोटाचे हाल करतात. आणि मग दुसरेच आजार सुरु होण्याची शक्यता अधिक असते. अँसिडिटीवर उपाय म्हणून अनेकजण भरमसाठ अँटासीडच्या गोळ्या घेताना दिसतात. त्यामुळे किडनीवर परिणाम होतो. तसेच अनेक जन कसले कसले सोडे पिऊन अँसिडिटी दूर करण्यासाठी मदत घेतात . परंतु यांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
1) थंड दूध प्या :
तुम्हाला अँसिडिटीचा त्रास होत असेल तर एक ग्लास थंड दूध प्या. या उपायचा अवलंब करून तुम्हाला तात्काळ आराम मिळू शकेल .आणि ॲसिडिटीपासून तुमची कायमची सुटका होईल.
2) ताक प्यावे :
ताक प्यायल्यानं पोटाची उष्णता शांत होते. अॅसिडिटी दूर करण्यासाठी काळी मिरी आणि कोथिंबीर ताकासोबत प्यायल्यानं खूप आराम मिळतो. सतत हा उपाय केल्याने तुमची ॲसिडिटी कुठल्या कुठे पळून जाईल.
3) पुदिन्याचे पानाचा रस :
अँसिडिटी , गॅस, अपचन यांसारख्या तक्रारींवर पुदिन्याची पाने रामबाण उपाय मानली जातात. अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास पुदिन्याच्या पानाचा रस करून तो प्यावा.
4) बडीशेप पाणी :
बडीशोप ही सर्वांचाच आवडीचा भाग असतो. परंतु तुम्हाला माहिती आहार का की बडीशोप अँसिडिटीवरचा रामबाण उपाय आहे. बडीशेपचं पाणी प्यायल्यानं अँसिडिटीची समस्या कमी होते. हे पाणी तयार करण्यासाठी १ ग्लास पाण्यात १ चमचा बडीशेप घाला. सुमारे ३० मिनिटांनंतर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. पाणी थंड झाल्यावर ते प्या. वरील सर्व उपाय वापरून तुम्ही अँसिडिटीला राम राम ठोकू शकता. मग आजपासूनच हे उपाय सुरु करा.