योगासनाचे ‘हे’ फायदे तुम्हांला माहित आहेत का? चला जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या जीवनात आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगासने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बदलत्या जीवनात शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहण्यासाठी योगा करणं गरजेचं आहे. आज आपण जाऊन घेऊया योगासनाचे आरोग्यदायी फायदे ….

मानसिक स्वास्थ्य लाभते-

योगासनांमुळे आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभते. नियमित योगा केल्याने आपले मन शांत होते तसेच मन एकाग्र करण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही जर कधी डिप्रेशन मध्ये असाल तर योग्य हा यावर उत्तम उपाय आहे.

वजन कमी होत-

सूर्य नमस्कार आणि कपालभाती सारखे योग शरीराचे वजन कमी करते. नियमित योगा करण्याने शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. परिणामी वाढत्या शारीरिक वजनाला मर्यादा पडतात आणि आपलं वजन कमी होत.

शारीरिक लवचिकपणा येतो-

नियमित योग केल्याने आपल्या शरीराला कोमलता, सामर्थ्य आणि लवचिकता मिळेल. योगासन केल्याने शरीर दृढ होते आणि स्नायू बळकट होतात. नियमित योगा केल्याने पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास कमी होतो.

शरीरातील थकवा जातो-

नियमित योगा केल्याने आपल्या शरीरातील थकवा दूर होणाया मदत होते. योगासनं केल्यानं ताजेपणा येतो शरीराला ऊर्जा मिळते. दिवसभरातील कामांमुळे आपलं शरीर आखडलेले असते, परंतु योगा केल्याने आपली संपूर्ण बॉडी रिलॅक्स होते. त्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.

श्वसनाच्या त्रासावर नियंत्रण-

नियमित प्राणायम केल्यानंतर श्वसनाच्या त्रासावर मोठा प्रभाव पडतो. प्राणायम करताना श्वसनाच्या गतीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक असत त्यामुळे व्यायाम होऊन श्वसनाशी संबंधित आजार बरे होण्यास मदत होते. दमा, ऍलर्जी यांसारख्या आजारांवर प्राणायम सर्वोत्तम उपाय आहे.