व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

हळदीच्या चहाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे माहित आहेत का ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हळद हा एक मसाल्याचं पदार्थ, फक्त अनेक प्रकारे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर म्हणून ओळखला जातो. जवळपास प्रत्येक जेवणात हळदीचा वापर आपण करतोच. हळदी मध्ये असलेले पोषक घटक हे माणसाच्या शरीराला खूपच उपयोगी आहेत म्हणूनच की काय आयुर्वेदात हळदीला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते. आपण आत्तापर्यंत हळद टाकून दूध पिले असेल पण हळदीच्या चहाबद्द्दल तुम्हांला माहित आहे का ? आज आपण जाणून घेऊया हळदीच्या चहाचे गुणकारी फायदे

हळदीचा चहा कसा तयार कराल-

सर्वप्रथम एक ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करा आणि दहा मिनिटे ते उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा आणि त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा. हा चहा दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

हळदीच्या चहाचे फायदे-

अंगदुःखी दूर करते-

हळद ही वेदनाशामक आयुर्वेदिक औषधी मानली जाते. त्यामुळे जर तुम्हाला अंगदुखीचा त्रास असेल तर आपण नक्कीच हळदीचा चहा प्यावा. या चहाचे सेवन केल्यानंतर अंग दुखण्यापासून आराम मिळू शकतो.

वजन कमी होते-

हळदीचा चहा प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. जर तुमच्या कंबरेभोवती खूप चरबी असेल तर दररोज हळदीचा चहा प्या. यामुळे वजन खूप लवकर कमी होईल.

हृदय निरोगी राहत-

हळदीमध्ये खुप अधिक अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येते. म्हणून हळदीचा चहा प्यायल्याने हृदय निरोगी राहत

डोळ्यांसाठी आहे उपयुक्त-

हळदीचा चहा डोळ्यांसाठी खूपचं फायदेशीर मानला जातो, हळदीच्या चहामध्ये खुप अधिक जीवनसत्त्वे असल्यामुळे हा चहा पिल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच डोळ्यांची दृष्टीही अबाधित राहण्यास मदत होते. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी हळदीचा चहा नक्की पिला पाहिजे.

मधुमेहावर नियंत्रण मिळते-

ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी अवश्य हळदीचा चहा प्यावा. हळदीच्या चहामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित होते याशिवाय ते शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढवू शकते.