लसींच्या उत्पादनात अपयश आले म्हणून फाशी घ्यायची का? केंद्रीय मंत्र्यांचं अजब विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. अशा अवस्थेत सर्वत्र लसींचा तुटवडा भासत आहे. नागरिकांतून लसींची जास्त मागणी होत असल्याने याबाबत योग्य ती कार्यवाही होणे गरजेची आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांनी एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजब विधान केलं आहे. यावेळी गौडा यांनी म्हंटल कि, ” अतिरिक्त डोसचं उत्पादन करता आलं नाही, तर मग आम्ही फाशी घ्यायला पाहिजे का? ” त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.

कोरोनाच्या या महाभयंकर परिस्थितीत लसींचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्रातून याबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. संपूर्ण देशातून लसींची मागणी होत असल्यामुळे केंद्र सरकारलाही आता अशावेळी निर्णय घेणे कठीण होऊन बसले आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांना केंद्रावर टीका करण्याचे आयतीच संधी मिळाली आहे.

केंद्रीय मंत्र्यांना एका पत्रकार परिषदेत लसींच्या तुटवड्यावरुन तसेच लसींच्या उत्पादनात केंद्र सरकारला अपयश आले. त्याबाबत आपल्याला काय वाटत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे नाराज झालेल्या मंत्र्यांनी अशा स्वरूपाचं अजब स्वरूपाचं विधान केलं. लसींच्या उत्पादनात केंद्र सरकारला अपयश आले? असा लसींच्या उत्पादनात अपयश आले म्हणून सरकारमध्ये असलेल्या लोकांनी फाशी घ्यायची का? असं गौडा म्हणाले. तसेच “काही गोष्टी आमच्या नियंत्रणाबाहेर आहेत, मग आम्ही त्याची व्यवस्था करू शकतो का? तरीही सरकार आपल्या पूर्ण ताकदीने काम उत्तम करत आहे,”असंहीशेवटी गौडा म्हणाले.

Leave a Comment