तान्हुल्यासाठी गायली अंगाई…धुळ्यातील माणुसकीशी नाळ जोडलेल्या डॉक्टरांचा मन हेलावून टाकणारा VIDEO

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा स्थितीत डॉक्टर्स हे अगदी देवदूत बनून काम करताना दिसत आहेत. कधी रुग्णांसाठी आई ,बाप तर कधी मुलगा बनून आपली सेवा बजावत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी या जगात पाऊल ठेवलेल्या एका तान्हुल्यासाठी आई बनून अंगाई गाणाऱ्या एका धुळ्याच्या डॉक्टरांचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा नक्कीच हळवे झाल्याशिवाय राहणार नाही. माणुसकीशी नाळ जोडलेल्या या डॉक्टरांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

धुळ्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिनय दरवडे यांचा हा व्हिडीओ आहे. त्यांनी याबाबत माहिती देखील दिली आहे. तर त्याच झालं असं की बालरोगतज्ञ डॉ. अभिनय दरवडे यांच्या रुग्णालयातील एका बाळाला झोप येत नव्हती. या बाळाचा ऑक्सीजनही कालच काढला होता शिवाय बाळ आईचं दूध पिऊ लागल्यामुळे त्याला थोडी ताकदही आली आहे. मात्र हे बाळ मोठ्याने रडत होते. काही केल्या हे बाळ गप्प बसेना आजूबाजूच्या बाळांनाही त्याच्या रडण्याचा त्रास होऊ लागला. अशा वेळी डॉक्टर अभिनय दरवडे यांनी या बाळाला आपल्या केबिनमध्ये नेले त्याला छान दोन-तीन गाणी गाऊन दाखवली आणि बाळ शांतपणे गाणी ऐकत होता गाणी ऐकता येतात हे बाळ झोपी गेलं… त्यांनी या व्हिडिओमध्ये अभिनय यांनी हिंदी चित्रपटातील ‘किस मोड पे आते हे’ हे गाणं म्हंटलं आहे.

(doctor became mother put baby to sleep he asleep listening to a melodious song on the palms of dr hands video)

https://www.facebook.com/100000526265877/videos/4612785052082325/

दरवडे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे की, “आमच्या NICU मधल्या ९०० ग्राम वजनाच्या या चिमुकल्याला झोपच येत नव्हती! कालपासून त्याचा ऑक्सिजन निघालाय, दूध प्यायला लागलाय तशी ताकद आलीय त्याला! मग काय रात्री रडायला सुरुवात!
NICU मधल्या आजूबाजूच्या दुसऱ्या पिटुकल्या बाळांना त्रास होईल इतक्या जोरात साहेबांनी रडायला सुरुवात केली! रडणं काही थांबेना!
मग त्याला जरा बाहेर आणलं (केबिन मध्ये)आणि गाणं म्हटलं, तसं ते शांत होऊन गाणं ऐकू लागलं, आणि नंतर दोन तीन गाणी म्हटल्यावर झोपी गेलं!
इवलंसं आहे पण स्वतःला काय हवं ते बरोबर मिळवून घेतलं पठ्ठ्याने”!

हा व्हिडीओ पाहून माणसाला माणुसकीची ,मायेची उब किती समाधान मिळवून देते याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. डॉक्टरकी बरोबरच आईचा रोल निभावणाऱ्या या डॉक्टरांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

Leave a Comment