लॉस एंजिलिस | वृत्तसंस्था भारतातील ग्रामीण भागात मासिक पाळीत महिलांच्या समस्या आणि पॅड ची अनुपलब्धता यावर भाष्य करणारा एक माहितीपट ‘पिरियड. दि एंड ऑफ सेंटेन्स’ याला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार ‘डॉक्यूमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट’ या श्रेणीत मिळाला आहे. हा माहितीपट रायका झेहताबची यांनी दिग्दर्शित केला आहे. तर भारतीय निर्मात्या गुणित मोंगा यांच्या ‘सिरिया एंटरटेनमेंट’ द्वारे निर्मित केला आहे.
हा माहितीपट लॉस एंजिलीस मधील ‘ओकवुड स्कूल’ आणि त्यांच्या शिक्षक मिलिसा बर्टन यांच्या विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या ‘द पॅड प्रोजेक्ट’ चा भाग आहे. झेहताबची ऑस्कर पुरस्कार स्वीकारताना म्हणाल्या कि, मला विश्वास बसत नाही मासिक पाळी यावर आधारित चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळू शकतो.
मिलीस बर्टन यांनी हा पुरस्कार त्यांच्या शाळेला अर्पण केला.त्या म्हणाल्या, ‘हा प्रकल्प जन्माला येण्याचे कारण म्हणजे माझ्या विद्यार्थी आणि भारतीय लोक यात बदल इच्छितात.’ हा माहितीपटातील कथा ही दिल्लीच्या बाहेरील ‘हापूर’ येतील आहे.२००९ मध्ये ‘स्लमडॉग मिलेनिअर’ याचित्रपटासाठी ए आर रहमान यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. तब्बल एक दशकानंतर हा पुरस्कार या माहितीपटाद्वारे भारताला परत मिळाला आहे.
इतर महत्वाचे –
महाराष्ट्र पोलीस दलात दोन महत्वपूर्ण बदल्या
दगडी चाळीतून अरुण गवळीला या अधिकाऱ्याने कॉलर पकडून बाहेर काढलं होतं.