कागदपत्रे तयार… वेळ आली की कारखान्यातील भ्रष्टाचार ओपन करणार : छ. उदयनराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

प्रत्येकवेळी कारण नसताना उदयनराजे यांनी भ्रष्टाचार केला असे म्हटले जाते. मी जर भ्रष्टाचार केला असता तर मी तुमच्यासोबत असतो, भ्रष्टाचार केला नाही म्हणून मी तुमच्यासोबत नाही. मी कुणाला माझा शत्रू समजत नाही, मी मित्र समजतो परंतु मी तत्वांशी तडजोड करत नाही. माझ्या लांबचा किंवा जवळाचा असला तरी तत्वांशी तडजोड नाही. छत्रपतींच्या आचार- विचाराचे आचरण करणे हे आमच्या घरातील प्रत्येकाचे काम आहे. कारखान्यांत इतका भ्रष्टाचार झाला आहे. कागदपत्रे आहेत सगळं आहे. आता वेळ आली की मी ओपन करायचे आहे आणि मी ते नक्की करणार असल्याचा इशारा खा. छ. उदयनराजे भोसले यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे नांव न घेता दिला.

साबळेवाडी (ता.सातारा) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी खा. उदयनराजे बोलत होते. यावेळी साबळेवाडी येथील पाण्याची टाकी, गावातील अंतर्गत व उपकेंद्राकडे जाणारा रस्ता आदी कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी माजी सभापती सुनील काटकर, युवा नेते संदीपभाऊ शिंदे, बाळासाहेब गोसावी, नाना शिंदे, बाळासाहेब ननावरे, माजी सरपंच रामदास कडव, विश्वजीत लाड, अशोक चांगण, सरपंच सौ. सुषमा जाधव, प्रभावती कडव, उपसरपंच विनय कडव, धर्माजी बाबर, प्रताप जाधव, नितीन कडव, काशिनाथ जाधव, सोपान साबळे, बबन वाघमळे, मारुती घागरे, विशाल जगताप उपस्थित होते. आदी उपस्थित होते.

छ. उदयनराजे म्हणाले, भ्रष्टाचाराशी संबधित लोकांना मी दोष देत नाही. कारण सकाळी उठल्यानंतर, दात घासताना, अंघोळ करताना, कपडे करताना, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण करताना आणि झोपतानाही त्याचा विचार भ्रष्टाचार असतो. दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावताना त्यांनी स्वतः आत्मपरिक्षण, आत्मचिंतन करावे. अन्यथा भविष्यात आत्मक्लेश करण्याची वेळ येईल असा टोलाही लगावला. कार्यक्रमावेळी  प्रास्ताविक लक्ष्मण कडव यांनी केले. आभार चंद्रकांत कडव यांनी मानले

Leave a Comment