अंडी खाण्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते का ? जाणून घेऊया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । सध्या देशभर ज कोरोनाचे संकट वाढते आहे. या काळात प्रत्येकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत आहे. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी प्रत्येकजण विशेष प्रयत्न करताना दिसत आहे त्याचपद्धतीने आपल्या आहारात वेगवेगळे बदल केले जात आहेत. अनेक जण आहारात अंड्यांचा समावेश करत आहेत. त्यामुळे अंडी आपले रोगप्रतिकार शक्ती वाढते कि नाही हे जाणून घेऊया

अंड्यामध्ये प्रोटीन चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यालोकांपर्यंत सगळ्यांना अंडी खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. अंड्यांमध्ये फक्त प्रोटीन नसते तर त्यामध्ये व्हिटॅमिन डी , कॅल्शियम, आणि इतर पोषक घटक सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. अंडी आपली त्वचा, स्किन, तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जास्त मदत करते. याचा आहारात समावेश केल्याने आपले केस मजबूत होतात तसेच आपली हाडे बळकट होण्यास मदत होते. अनेक लोकांच्या कडून ऐकले गेले असेल कि , ज्या लोकांना कोरोना झाला होता त्या लोकांना अंडी खायला दिली जात होती. म्हणजे कोरोनाच्या काळात अंडी खाणे जास्त महत्वाचे आहे.

अंड्यामध्ये अँटिऑक्सिडंट घटक असतात. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी चे प्रोटीन आणि सेलेनियम, व्हिटॅमिन ए तसेच व्हिटॅमिन बी चा सुद्धा समावेश असतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक व्यक्तीने दिवसातून कमीत कमी कमी दीड ते दोन अंडी खाल्ली जावीत. शरीराला इन्फेकशन पासून बचाव करण्यासाठी सुद्धा अंड्याचा फायदा होतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment