मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील मीरा रोड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मीरा रोड परिसरात एक चिमुकला आपल्या मित्रांसह सोसायटीच्या आवारात खेळत होता. यावेळी एका भटक्या कुत्र्याने त्याला चावा (dog bites child) घेतला. हि संपूर्ण घटना त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
काय घडले नेमके ?
मीरा रोडच्या पूनम सागर परिसरात सात वर्षांच्या मुलाला कुत्र्याने चावा (dog bites child) घेतला आहे. हि संपूर्ण घटना मीरा रोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्समध्ये घडली आहे. अर्जुन गुप्ता असे त्या पीडित मुलाचे नाव आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, सोसायटीच्या आवारात काही मुलं खेळताना, ईकडे तिकडे पळताना दिसून येत आहेत.
सोसायटीत खेळणाऱ्या चिमुकल्याला कुत्र्याने घेतला चावा pic.twitter.com/irsfMunO0H
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 2, 2022
अर्जुन गुप्तासुद्धा त्यामध्ये खेळताना दिसत आहे. यावेळी खेळता खेळता अचानक अर्जुन गुप्ता याचा पाय धावता धावता कुत्र्यावर पडतो त्यामुळे तो कुत्रा खवळतो आणि तो अर्जुन गुप्तावर हल्ला (dog bites child) करतो. या धक्कादायक प्रकारामुळे सोसायटीच्या आवारत खेळणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
हे पण वाचा :
नाशिकमध्ये रेल्वेखाली उडी घेऊन माय-लेकीची आत्महत्या
बड्डे आहे भावाचा !!! जल्लोष साऱ्या गावाचा !!!
राज्यसभा निवडणुकीत कोणी घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास…; संजय राऊतांचा थेट फडणवीसांना इशारा
राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी कपात केली जाणार ???
आता खिसा होणार रिकामा, जूनमध्ये केले जाणार ‘हे’ 5 आर्थिक बदल !!!