डोंगर खचून मालकाचं घर गाडलं गेलं; पाळीव कुत्रा 2 दिवसांपासून ढिगार्‍याकडे पाहत उभा

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : राज्यात पावसाने हाहाकार केला असून रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत महापूर आला आहे. अनेक ठिकाणी भुस्खलन, दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. आत्तापर्यंत 112 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर 99 जण अजूनही बेपत्ता आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोसरे नावाच्या गावात डोंगर खचून घरांवर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. तब्बल 17 तासानंतर या गावात मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 14 जणांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. या ठिकाणी एका ढिगार्‍यासमोर एक कुत्रा  मागील दिन दिवसांपासू उभा आहे.

एनडिआरएफ च्या टीमने हुसकावूनपण तो तेथून हलत नाहीये. डोंगर खचून मालकाचं घर गाडलं गेल्यानं हा कुत्रा भावनिक झाला आहे. मागील दोन दिवसांपासून मुका जीव ढिगार्‍याकडे पाहत उभा असल्याचं एनडिआरएफ च्या एका जवानानं सांगितलंय. एका जवानांन सदर कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मिडियात पोस्ट केल्यानंतर तो सध्या व्हायरल होत आहे.

खेड तालुक्यातील पोसरे- बौद्धवाडी याठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे पोसरे गावात शोककळा पसरली आहे. आज सकाळपासून मातीच्या ढिगाऱ्याखालून 9 मृतदेह काढण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण 15 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले आहेत. अजूनही 2 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय.

You might also like