मी राष्ट्राध्यक्ष असतो तर….; युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरू असून हे युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. अनेक ठिकाणी गोळीबार आणि बॉम्ब हल्ले सुरूच असून परिस्थिती अत्यंत भीषण बनली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलं आहे. मी राष्ट्राध्यक्ष असतो तर अस काही घडलंच नसत असे त्यांनी म्हंटल.

ट्रम्प म्हणाले, माझ्या संपूर्ण कार्यकाळात युद्ध झालं नाही. मी आपल्याला युद्धातून बाहेर काढलं. व्लादिमिर पुतीन हे जो बायडेन यांना एखाद्या ढोलसारखे वाजवत आहेत. मी राष्ट्राध्यक्ष असतो तर अस घडलंच नसत असे म्हणत त्यांनी बायडेन यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ येताच अमेरिका राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाला इशारा दिला आहे. आता तिसर महायुद्ध हाच अंतिम उपाय आहे असं त्यांनी म्हंटल. तसेच अमेरिका कडून युक्रेन ला अनेक शस्त्रास्त्रे पुरवण्यात आली आहेत. तर इतर अनेक युरोपियन देशांनीही युक्रेनला मदतीचा हात दिला आहे.