मोठी बातमी! अमेरीकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाॅशिंग्टन | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी कोरोनाव्हायरस विरुद्ध लढण्याकरता अमेरिकेत राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे. रोज गार्डन येथील पत्रकार परिषदेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सदर घोषणा केली. वेगाने पसरलेल्या कोरोनाव्हायरस आजाराविरुद्धच्या लढाईसाठी ट्रम्प यांनी ५० अब्ज डॉलर्स फेडरल फंडासाठी दिले आहेत.

ट्रम्प व्हाईट हाऊसच्या लॉनवर दिलेल्या निवेदनात म्हणाले, ‘अमेरिका संघाची संपुर्ण ताकद कोरोना व्हायरसला समुळ नष्ट करण्यात लागावी याकरता मी अधिकृतपणे राष्ट्रीय आपत्तीची घोषणा करीत आहे.’ तसेच ट्रम्प यांनी यावेळी सर्व अमेरिकन राज्यांना आपत्कालीन ऑपरेशन सेंटर सुरू करण्याचे आवाहन केले.

आणीबाणीच्या घोषणेमुळे एखाद्या राज्याला तातडीचे कामगार, वैद्यकीय चाचण्या, वैद्यकीय पुरवठा, लसीकरण, वैद्यकीय सुविधांची सुरक्षितता आणि इतर अनेक खर्चासाठी फेडरल कॉस्ट-शेअर्सची विनंती करण्याची परवानगी देण्यात येईल, असे एका डेमॉक्रॅट्सने या आठवड्याच्या सुरूवातीला अध्यक्षांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

१९६० च्या दशकापासून सार्वजनिक आरोग्यासंबंधीच्या धोक्यांबद्दल केवळ काही आपत्कालीन घोषणा केल्या गेल्या आहेत. २००० मध्ये राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी वेस्ट नाईल व्हायरसला उत्तर म्हणून न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमध्ये आणीबाणी जाहीर केली. तेव्हा केवळ दोन जणांना रोगाचा प्रादुर्भाव झाला होता.

Leave a Comment