अमेरिकेला आणखी महान बनवण्यासाठी मला परत यावेच लागेल – डोनाल्ड ट्रम्प

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाची लागण झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून स्वतःच्या तब्बेतीची माहिती दिली तसेच मला परत यावंच लागेल कारण आम्हाला अमेरिकेला आणखी महान बनवायचं आहे. आम्हाला यूएसएला महान बनवायचं आहे त्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे.असही ट्रम्प म्हणाले.

वॉल्टर रीड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. ट्रम्प यांचे डॉक्टर सीन कॉनली यांनी सांगितलं की गुरुवारी सायंकाळी त्यांना कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. काल त्यांनी कोरोना झाल्याचं सांगत क्वारंटाईन होत असल्याचं म्हटलं होतं.

ट्रम्प यांनी ट्विट करत म्हटले,”परत येण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत. मला परत यावंच लागेल कारण आम्हाला अमेरिकेला आणखी महान बनवायचं आहे. आम्हाला यूएसएला महान बनवायचं आहे त्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे. एकत्र येऊन काम करा आणि ते पूर्ण करा”

दरम्यान, चीनमधून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला. जगात सर्वात जास्त रुग्णसंख्या ही आजघडीला अमेरिकेत आहे. तसेच कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू देखील अमेरिकेत झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like