Wednesday, March 29, 2023

ट्रम्प यांचा ३ तासांचा गुजरात दौरा तब्बल १०० कोटींचा; गुजरात आणि केंद्रानं खिसा केला ढिला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प पहिल्यांदाच दौऱ्यावर येणार आहेत.  ट्रम्प यांचा भारत दौरा कायम संस्मरणारत राहावा म्हणून त्याच्या स्वगातासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घातलं आहे. ट्रम्प दाम्पत्यांच्या भारत दौऱ्याची सुरूवात २४ फेब्रुवारी २०२० पासून मोदींचं गृह राज्य असणाऱ्या गुजरातच्या अहमदाबाद शहरातून करणार आहेत.

सध्या गुजरात सरकारकडून अहमदाबादमध्ये ठिकठिकाणी तयारी सुरू केली जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या तीन तासांच्या गुजरात दौऱ्यासाठी तब्बल १०० कोटींचा खर्च करण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर विमानतळ ते कार्यक्रम स्थळापर्यंतच्या प्रवासात ट्रम्प यांना झोपड्यांचं दर्शन होऊ नये यासाठी एक मोठी भिंतही उभारण्यात येते आहे.

- Advertisement -

ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पैशांची कोणतीही कमतरता भासू नये, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानतर अहमदाबाद नगर निगम आणि अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरण रस्ते दुरुस्तीच्या कामात जुंपेल आहेत. यासाठी जवळपास १०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातील काही खर्चाचा भार केंद्रीय सरकार उचलणार आहे परंतु, खर्चातील मोठा भाग राज्याला भागवावा लागणार आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.