पॉर्नस्टार स्टोर्मी डॅनियल्सला डोनाल्ड ट्रम्प देणार ३३ लाख रुपये ; पहा काय आहे प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या वादग्रस्त स्वभावामुळे सतत चर्चेत असतात. २०१६ मधील राष्ट्राध्यक्ष निवडीवेळी त्यांच्या बाबतीत स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दाही चांगलाच चघळला गेला होता. अमेरिकन पॉर्नस्टार स्टोर्मी डॅनियल्स हिनेसुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांचे आपल्याशी अफेअर असल्याचं विधान केलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी याला स्पष्ट नकार दिला होता.

दरम्यान या प्रकरणावर कोर्टात अधिक सुनावणी न होता हा खटला रद्द झाला. मात्र या खटल्यात स्टोर्मी डॅनियल्सला करावा लागलेला ३३ लाखांचा खर्च भरून देण्याचे आदेश कॅलिफोर्निया कोर्टाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिले आहेत.

या निकालानंतर स्टोर्मिने अजून एक विजय म्हणत आनंद व्यक्त केला आहे. तिने २००६ साली आपली आणि ट्रम्प यांची ओळख झाल्याचं सांगत त्यांच्याशी शारीरिक संबंध असल्याचाही गौप्यस्फोट केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’