हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात अनेक लोक गाढवाचं देखील मांस खातात. आंध्र प्रदेशात गाढवाचं मांस खाण्याबाबत अनेक वेगवेगळे तर्क आहेत. गाढवाचं मांस खाल्ल्याने अनेक रोगांपासून दूर होता येतं, असं आंध्र प्रदेशच्या लोकांचं म्हणणं आहे. गाढवाचं मांस खाल्ल्याने श्वास घेण्यास अडथडा येत असलेली समस्या दूर होते. त्याचबरोबर गाढवाचं मांस खाल्लं तर लैंगिक क्षमता वाढते, असा त्यांचा दावा आहे. आंध्र प्रदेशच्या लोकांच्या अशा प्रकारच्या भावनांमुळे तेथील लोक अन्नात गाढवाचं मांस खातात.
गाढवाचे मटण खाल्ल्याने कामोत्तेजना वाढते असा काहींचा समज आहे. या समजामुळे देखील गाढवाच्या मटणाला असलेली मागणी वाढीस लागल्याचं बोललं जात आहे. आंध्र प्रदेशातील प्रकासम, कृष्णा, पश्चिम गोदावरी आणि गुंटूर जिल्ह्यात गाढवाचे मटण सर्वाधिक खाल्ले जाते असे प्राणीमित्र गोपाळ सुराबथुला यांनी म्हटलं आहे. त्यांनी सांगितले की गुरुवारी आणि रविवारी गाढवाच्या मटणाला सर्वाधिक मागणी असते.
उच्चशिक्षित, चांगल्या घरातली माणसंही हे मटण खरेदी करायला येतात. या दोन दिवसांत जवळपास 100 गाढवांची कत्तल केली जाते असा दावाही त्यांनी केला आहे. आंध्र प्रदेशात गाढवांची संख्या कमी होत चालल्याने गाढव कापणारे खाटीक कर्नाटक, तमिळनाडू आणि महाराष्ट्रातून ती आणत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’