हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । प्रत्येक स्त्री ला आपण सुंदर आणि छान दिसायला हवे असे वाटत असते. त्यासाठी ती न विशेष प्रयत्न सुद्धा करत असते. अनेक वेळा ज्या महिला या जास्त सजतात त्याच्यावर अनेक ठिकाणावरून टीका होत असते. परंतु स्त्रियांना सुंदर दिसायला आवडते.पण खरी गोष्ट अशी आहे की, स्वतःला मेकअप करण्याने व तिला आत्मविश्वास येत असतो आणि हे कोणत्याही स्त्री साठी महत्वाचे आहे. परंतु तुमचा लुक बदलणार असेल आणि जर मेक अप केल्यामुळे जर तुम्हाला उत्साहित व ठामपणा येत असेल तर त्यात काहीच चुकीचे नाही. तेव्हा ह्याच मेक अप च्या काही गोष्टीवरून काही माहिती घेण्याचा आज प्रयत्न करूया .
मेक अप मध्ये अनेक वेगवेगळे प्रकार सामावलेले असतात. चेहऱ्यावर क्लीनअप, थ्रेडिंग, ब्लीचिंग ह्यातच फेशियल नावाचा प्रकार येतो. त्यामुळे त्याच्या सौन्दर्यात वाढ होते.फेशियल केल्याने त्वचा ग्लो होते आणि सुंदर दिसायला सुरुवात होते. फेशियल केल्याने आपल्या चेहऱ्यावरच्या आणि त्वचेवरच्या मृत पेशी निघून जाऊन त्वचा ही खूप मऊ आणि निखळ होऊन जाते. अनेक वेळा फेशिअल करताना वेगवेगळ्या प्रॉडक्ट चा वापर केला जातो. अनेक महिला फेशियल हे घरीच करतात. काही स्त्रिया ह्या पार्लर मध्ये फेशियल करतात.
फेशियल केल्यानंतर आपल्या चेहऱ्याला कधीही साबण किंवा फेसवॉश वापरू नये. कारण तुमचा चेहरा क्लीन होण्यापेक्षा केमिकल मुळे अजून खराब होऊ शकतो. साबण आणि फेसवॉश मध्ये काही प्रमाणात केमिकल असतात. जर तुम्हाला फेशियल करायचे असेल तर संध्याकाळी करा आणि इतर वेळेला फेशिअल केले तर त्यानंतर मात्र तुम्ही उन्हात जाऊ नका. त्यामुळे शक्यतो संध्याकाळी फेशियल केल्यावर तुम्हाला बाहेर निघता येणार नाही याची काळजी घ्या. उन्हापासून बचाव करण्यासाठी मास्क लावून घ्या. कारण फेशियलनंतर तुमचा चेहरा हा सॉफ्ट होत असतो. आणि लगेच अल्ट्राव्हायोलेट किरण हे तुमच्या चेहऱ्यावर परिणाम करू शकता. त्यामुळे उन्हात जाणे हे पूर्ण काही दिवस टाळा. केमिकल युक्त आणि कॉस्मेटिक प्रोडक्ट लगेच फेशियलवर लावू नका. त्वचेला स्किन इन्फेक्शन होऊ शकते. ज्या प्रॉडक्ट बद्धल माहिती नाही अश्या प्रॉडक्ट चा वापर आपल्या चेहऱ्यासाठी करू नका.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’