हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकारकडून आणल्या गेलेल्या प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना व राज्याच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार सेवा मिळत आहे.. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी नागरिकांकडे आयुष्यमान कार्ड असणे बंधनकारक आहे. हे कार्ड आपल्याला घरबसल्या देखील फोनवरून सहज Download करता येऊ शकते. आज आपण तीच प्रक्रिया जाणून घेणार आहोत. (Ayushman Bharat Yojana)
आयुष्मान कार्ड कसे Download करावे?
1) सर्वात पहिल्यांदा आयुष्यमान भारतच्या https://pmjay.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जावा.
2) तेथे तुमचे आयडी लॉगिन करा. त्यासाठी तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका.
3) पुढे एक पेज open होईल तेथे 12 अंकी आधार क्रमांक टाका. तसेच तुमचे, अंगठ्याचे ठसे पडताळा. यानंतर Approved Beneficiary लॉगिन पर्याय निवडा.
4) हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला मंजूर गोल्डन कार्ड्सची यादी दिसेल. तेथे तुमचे नाव शोधा. यानंतर ‘Confirm Print’ या पर्यायावर क्लिक करा.
5) पुढे, तुम्हाला CSC Wallet दिसेल, तेथे पासवर्ड टाका आणि पिन टाका. यानंतर तुम्हाला उमेदवाराच्या नावाने कार्ड डाउनलोड करा हा पर्याय येईल. तेथे Download या पर्यायावर क्लिक करून आयुष्यमान कार्ड डाऊनलोड करून घ्या.
5 लाखांपर्यंत मोफत उपचार
महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत या दोन्ही योजनेअंतर्गत बाराशेपेक्षा जास्त आजारांवर पाच लाखांपर्यंत मोफत उपचार घेता येऊ शकतो. परंतु त्यासाठी नागरिकांकडे आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत औषधांचा, उपचाराचा खर्च सरकार उचलत आहे.