इस्लामपूर येथील डॉ. सांगरुळकरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | इस्लामपूर येथील लक्ष्मीनारायण हॉस्पिटलचे डॉ. सचिन सांगरुळकर यांच्या हलगर्जीपणामुळे कापूसखेड येथील धोंडीराम पाटील यांचा मृत्यू झाला. या मृत्यूची चौकशी करुन संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत पाटील यांच्या पत्नीसह सर्वपक्षीय नेत्यांच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

डॉ. सांगरुळकर यांच्यावरील कारवाईचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांना माजी खासदार राजू शेट्टी, एमआयएमचे शाकीर तांबोळी, मराठा क्रांतीचे संजय पाटील, उमेश कुरळपकर, मनसेचे सनी खराडे, मकरंद कुरणे, अॅड शमशुद्दिन संदे, मयत धोंडीराम पाटील यांच्या पत्नी रुपाली पाटील यांच्या शिष्टमंडळाने दिले. निवेदनात म्हटले आहे की, कापूसखेड येथील धोंडीराम पाटील हे कोरोना बाधित आल्याने इस्लामपुरातील डॉ. सांगरुळकर यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले.

काही दिवसांच्या धोंडिराम पाटील उपचारानंतर रुग्ण उपचारास प्रतिसाद देत असून लवकरच बरा होईल, असे सांगितले. प्रत्यक्षात रुग्णाला भेटणाऱ्या नातेवाईकांना रुग्णाने ऑक्सिजन मिळत नसल्याचे सांगत होता. त्यानंतर रुग्ण अत्यवस्थ झाल्याचे सांगण्यात आले. चुकीचे उपचार होत असल्याने निदर्शनास आले. वारंवार पाठपुरावा करुनही योग्य उपचार देण्यात आले नाहीत. रुग्णालयाचे बिल वाढवण्याच्या हेतूने अनावश्यक औषधांचा मारा करण्यात आला. त्यानंतर 2 मे रोजी दुपारी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपल्याने पाटील यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी डॉ. सांगरुळकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन वैद्यकीय सेवेचे प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केली.

Leave a Comment