Sunday, March 26, 2023

मृतांच्या नावाने राजकारण करणं हे जमिनीवरील ‘या’ गिधडांकडून शिकावं; हर्षवर्धन यांनी राहुल गांधींना सुनावलं

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने मोदी सरकारच्या कोरोना काळातील धोरणावर टीका करत आहेत. आता तर त्यांनी  न्यू यॉर्क टाइम्स वृत्तपत्राचा दाखला केंद्र सरकार वर कोरोनाच्या आकडेवारी वरून निशाणा साधला होता. त्यावर आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी प्रत्युत्तर देत राहुल गांधींवर निशाणा साधला. मृतांच्या नावाने राजकारण करणं हे जमिनीवरील ‘या’ गिधडांकडून शिकावं, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींना खडेबोल सुनावले.

हर्षवर्धन यांनी ट्विट करत म्हंटल की, मृतांच्या नावाने राजकारण करणं काँग्रेसची पद्धत आहे. झाडांवरील गिधाडं सध्या दिसेनासी झाली अशली तर त्यांच्यातील ऊर्जा जमीनीवरील गिधडांमध्ये आल्यासारखं वाटत आहे. राहुल गांधींना दिल्लीपेक्षा न्यू यॉर्कवर अधिक विश्वास आहे. मृतांच्या नावाने राजकारण करणं हे जमिनीवरील ‘या’ गिधडांकडून शिकावं,” असं ट्विट हर्ष वर्धन यांनी केलं आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे कोरोना संकटाच्या काळात राहुल गांधी प्रत्येक मुद्द्यावर मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतीच राहुल यांनी लस संदर्भात सरकारवर निशाणा साधला होता. राहुल म्हणाले होते की सरकारने येथील लोकांकडे दुर्लक्ष केले आणि विदेशातील आपली प्रतिमा सुधारण्यासाठी या लसीची निर्यात केली. याशिवाय राहुल गांधींनीही टूलकिट प्रकरणांवर सरकारला घेराव घातला. या प्रकरणात कॉंग्रेसने अनेक मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.