डॉ.पूनम राठोड अ‍ॅथलेटिक्सची पंच परीक्षा उत्तीर्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | अ‍ॅथलेटिक्स फेडेरेशन ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या तांत्रिक अधिकारी पदाच्या पंच परीक्षेत डॉ.पूनम राठोड या उत्तीर्ण झाल्या आहेत. अ‍ॅथलेटिक्सच्या राष्ट्रीय खेळाडू राहिलेल्या डॉ.पूनम राठोड या सरस्वती भवन महाविद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत.

केद्र व राज्य शासनाच्या अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या माध्यमातून वतीने घेण्यात आलेल्या तांत्रिक अधिकारीपदासाठी घेण्यात आलेल्या पंच परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत डॉ. पूनम उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे. आशियाई स्पर्धेत पदकविजेता तेजस शीर्षे हा खेळाडूदेखील पूनम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला आहे.

देशभरात ऑनलाईन लेखी आणि प्रात्यक्षिक पद्धतीने घेण्यात आलेल्या या पंच परीक्षेत औरंगाबादमधून एकमेव डॉ.पूनम राठोड उत्तीर्ण झाल्या. याबद्दल त्यांचे महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार श्रीकांत जोशी, सहसचिव पंकज भारसाखळे, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ.फुलचंद सलामपुरे, कार्याध्यक्ष डॉ.रंजन बडवणे, उपाध्यक्ष शशिकला निळवंत, कोषाध्यक्ष मोहन मिसाळ यांनी पूनम राठोड यांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

Leave a Comment