हेमलकसा । जेष्ठ समजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे आणि त्यांचा मुलगा अनिकेत आमटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लक्षण जाणवताच टेस्ट केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांना कुठलाही त्रास नसून खबरदारी म्हणून त्यांनी संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
हॅलो महाराष्ट्रशी बोलताना अनिकेत आमटे म्हणाले, ” मी आणि आई डॉ.मंदाकिनी आमटे कोरोना पॉझिटिव्ह झाले आहोत. काल RTPCR टेस्ट केली.आज रिझल्ट आला.सध्या आम्हाला कुठलाही त्रास नाही. गेल्या काही दिवसात आमच्या संपर्कात आलेल्यांनी कृपया काळजी घ्यावी.”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’