डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक दिवसासाठी निर्बंध उठवा : भाजपा

औरंगाबाद | शहरात लागू करण्यात आलेला मिनी लॉकडाऊन आणि जमावबंदीचा आदेश या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. मात्र यंदा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सरकारने निदान एक दिवसासाठी तरी निर्बंध शिथील करावेत, याबाबतचे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी एक दिवसासाठी कोरोनाचे निर्बंध शिथील करावेत, जेणेकरून ही जयंती नागरिकांना उत्साहात साजरी करता येईल. शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन काटेकोरपणे पालन करून व नियमांचे उल्लंघन न करता जयंती साजरी केली जाईल, असेही निवेदनाद्वारे सरकारला कळवणार असल्याचे या शिष्टमंडळाने म्हटले आहे. त्यामुळे जनतेच्या भावनाचा आदर राखून निर्बंध एक दिवसासाठी शिथील करावेत, असेही विनंतीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दरवर्षी १४ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात महामानव डाॅ. आंबेडकडर यांची जयंती साजरी केली जाते. मात्र सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे शासनाने अनेक निर्बंध घातलेले आहेत. यामुळे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करता येणार नाही. तेव्हा आता जिल्हाधिकारी निर्णय काय घेणार ?

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

You might also like