एक तर निर्बंध पूर्ण हटवा नाहीतर….; राजेश टोपेंची मुख्यमंत्री ठाकरेंकडे विनंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला. कालांतरणानंतर लॉककडाऊन हटवत निर्बंध काहीशे शिथिल करण्यात आले. मात्र, आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच टप्प्यातील निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. अशात सर्वसामान्यांकडून एक तर निर्बंध कडक करण्याचे नाहीतर हटवण्याची मागणी होत असल्याने राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे कि, “राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता एक तर निर्बंध पूर्ण हटवावेत, नाहीतर सर्वत्र कडक लॉकडाऊन करण्यात यावा.”

राज्यात कडक लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य सध्या हैराण झाले आहेत. तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर अधिक बोजा पडत आहे. याबाबत नागरिकांकडून निर्बंध शिथिल करण्याबाबत मागणी केल्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. लॉकडाऊनबाबत मागणी करताना डॉ. टोपे यांनी म्हंटले आहे कि, “कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध पूर्णतः काढून जनतेला दिलासा द्यावा किंवा कडक लॉकडाऊन करावा. “देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अजूनही आहे.

राज्यात पश्चिम महाराष्ट्रात करोनाचा उद्रेक कायम असला, तरी राज्याच्या इतर भागात करोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मात्र तरीही निर्बंध पूर्णतः शिथिल करण्यात न आल्यामुळे सर्वसामान्य त्रस्त आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत आहे. यासंबंधी ठरावही सरकारने केला आहे. विधिमंडळात ठराव करून तो केंद्र सरकारला पाठवला असल्याचे डॉ. टोपे यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment