राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत द्रौपदी मुर्मु यांचा मोठा विजय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) च्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांनी दमदार विजय मिळवला आहे. या विजयासह त्या देशाच्या 15 व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. तसेच द्रौपदी मुर्मु यांच्या रूपाने देशाला पहिली आदिवासी राष्ट्रपती मिळाली आहे. निवडणुकीच्या सुरुवातीपासून द्रौपदी मुर्मु यांचा विजय निश्चित मानला जात होता.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी म्हणजे 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 98.90 मतदान झालं. 727 खासदार आणि 9 आमदारांसह एकूण 736 लोकप्रतिनिधींना संसद भवनात मतदानाला परवानगी देण्यात आली होती. द्रौपदी मुर्मू यांना 812 मतं तर यशवंत सिन्हा यांना 521 मतं मिळाली आहेत. 25जुलै ला त्या आपला शपथविधी घेतील.

कोण आहेत द्रौपदी मुर्मु-

र्द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहे. द्रौपदी मुर्मु य शिक्षिका असून त्यांनी 1997 मध्ये नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्या भाजपच्या तिकिटावर मयूरभंज मध्ये रायरंगपूरमधून दोन वेळा आमदार होत्या. बिजू जनता दल आणि भाजपच्या सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्रिपदाची धुरा सांभाळली. 2015 मध्ये मुर्मू या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल होत्या.

Leave a Comment