मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काॅलेजचे तरुण-तरुणी मोबाईलवर बोलत गाडी चालवताना अनेकदा पहायला मिळतात. मोबाईलमुळे अपघात झाल्याचं आपण वरचेवर ऐकत असतो. मात्र मुंबईसारख्या शहरातील रस्त्यांवर बेस्ट बसचा ड्राइव्हर मोबाईलवर व्हिडिओ (video viral) काॅलवर बोलत गाडी चालवत होता असं कोणी सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवाल काय? पण हे खरोखर घडलं आहे. बेस्ट बसवरील ड्राइवर चक्क रहदारी असणार्या रस्त्यावर व्हिडिओ (video viral) काॅलवर बोलत बस चालवतानाचा एक व्हिडिओ (video viral) सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस ते चर्चगेट रुटवरील बसचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये बेस्ट बसचा ड्राइवर चक्क एका हातात मोबाईल अन् दुसरा हातात स्टेअरींग धरुन बस चालवताना दिसतो आहे. सदर बसमध्ये 40 हून अधिक प्रवाशी प्रवास करत असल्याचे बोलले जात आहे. ड्राइवरच्या हलगर्जीपणामुळे 40 प्रवाशांचा जीव टांगणीला लागल्याने नागरिकांमधून या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
https://www.instagram.com/p/CmouVNGhKev/?igshid=OGQ2MjdiOTE=
दरम्यान, सध्या अनेक ड्राइवर काॅन्ट्रेक्टवर नेमण्यात आलेले आहेत. काॅन्ट्रेक्टवर नेमणुक झालेले कर्मचारी अनेकदा अशाप्रकारचा बेजबाबदारपणा दाखवत असल्याचे दिसले आहे. घटनेचा व्हिडिओ (video viral) व्हायरल झाल्यानंतर नेटकर्यांनी सदर ड्राइवरवर कारवाईची मागणी केली आहे.
हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या