धुळे – विहिरीत उडी मारुन नवविवाहितेची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे प्रतिनिधी । तालुक्यातील मोरशेवडी गावातील विहिरीत नवविवाहितेचा मृतदेह आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली. विवाहिता सोमवार पासून दिसत नसल्याने नातेवाईकांनी सर्वञ शोध घेतला . परंतु ती सापडली नाही . मंगळवारी सकाळी गावाजवळील एका विहिरी जवळुन दुर्गधी येत आल्याने काही लोकांनी विहिरीत डोकावुन पाहिले असता , विवाहितेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.

Untitled design (62).jpg

नागरीकांनी याबाबत तालुका पोलींसांना घटनेची माहिती कळवली . माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत विहिर आणि परिसराची पहाणी करुन नागरीक व नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतुन बाहेर काढुन शवविच्छेदन कक्षाकडे नेण्यात आला.

या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.पोसमार्टम रिपोर्ट आल्यावर आत्महत्येमागील कारण स्पष्ट होऊ शकेल , अशी माहिती तालुका पोलीसांनी नातेवाईकांना दिली . याबाबत तालुका पोलीसांत गुन्हा नोंद करण्याचे काम उशीरा पर्यत सुरु होते.

Leave a Comment