Monday, February 6, 2023

रायगडमध्ये 879 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; अफगाणिस्तान इराणमार्गे आणला होता साठा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रायगड जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट बंदरातुन तब्बल 879 कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.तब्बल 293 किलोचा अंमली पदार्थांचा एवढा मोठा साठा अफगाणिस्तान इराणमार्गे भारतात आणला गेला आहे अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अफगाणिस्तानातून इराणमार्गे भारतात आणलेले हे अमली पदार्थ रायगडमधून पंजाबला नेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या अमली पदार्थाच्या तस्करीबाबत मोठं जाळं समोर येण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, याप्रकरणी DRI च्या अधिकाऱ्या संबंधित आरोपींनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू केली आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थाची बाजारातील किंमत तब्बल 879 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती DRI च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.