शिक्षण संस्थांनी पालकांना पूर्ण फीसाठी सक्ती केल्यास गाठ आमच्याशी आहे- बच्चू कडू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती । गेल्या काही दिवसांमध्ये शाळांकडून पालकांना फी भरण्यासाठी सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या तक्रारींची दखल घेताना बच्चू कडू यांनी म्हटले की, ज्या संस्था या पालकांच्या भरवश्यावर मोठ्या झाल्या अशा संस्था फक्त एक वर्ष अर्धी फी घेऊ शकत नाही का? जर तुम्ही सक्ती केली तर गाठ आमच्याशी आहे हे शिक्षण संस्थांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.

सध्या कोरोना महामारीमुळे अनेक पालक आर्थिक संकटात आहेत. अशा वेळी त्यांच्यासोबत शिक्षण संस्थांनी उभे राहावे असे आवाहनही बच्चू कडू यांनी केले. जर शिक्षणसंस्थांनी ऐकले नाहीतर सरकार म्हणून आम्हाला कारवाई करावी लागेल, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

शेतकऱ्यांवर दर दोन तीन महिन्यांनी संकट येत असतात. पण शिक्षण संस्थांवर आतापर्यंत कुठलेच संकट आलेले नाही. आतापर्यंत शिक्षणसंस्था या फायद्यातच होत्या. एखाद्या संस्थने सांगावे की आमची संस्था तोट्यात आहे. गेल्या २० वर्षांपासून या संस्थांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या फी वर आम्ही कधी बोललो नाही. पण आता हे संकट मोठ त्यामुळे किमान यावर्षी विद्यार्थ्यांकडून शिक्षण संस्थांनी ५० टक्केच फी आकारावी, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment