पंढरपूर । कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी कार्तिकी वारीची महापूजा केली, आषाढी वारीची महापूजा करण्याचा योग कधी येणार? अर्थात मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर कधी बसणार असा अप्रत्यक्ष प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंढरपुरात विचारण्यात आला. त्यावर “जे काही पांडुरंगाच्या आशीर्वादाने मिळतं, त्यात समाधान मानायचं असतं” असं म्हणत अजितदादांनी प्रश्न टोलवला.
पंढरपुरात आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांना सपत्नीक मिळत असतो. आषाढी वारीची महापूजा करण्याचा योग कधी येणार? असा आडून प्रश्न विचारत पत्रकारांनी अजित पवारांना मुख्यमंत्रिपदावर कधी विराजमान होणार, असे अप्रत्यक्षपणे विचारले. यावर “ते साकडं इथे नसतं घालायचं नसतं. विरोधात असलेल्या प्रत्येकाला सरकारमध्ये जावंसं वाटत असतं. आम्हीही विरोधात होतो, आम्हालाही वाटायचं आपण सरकारमध्ये जावं, लोकांची कामं करावी. त्यावेळी जे सरकारमध्ये होते, ते आता विरोधात आहेत. त्यामुळे त्यांना वाटणारच हे सरकार जावं आणि आपल्याला संधी मिळावी. या राजकीय गोष्टी चालत असतात, त्यात पांडुरंगाला ओढायचं काही कारण नाही. जे काही पांडुरंगाच्या आशीर्वादाने मिळतं, त्यात समाधान मानायचं असतं आणि पुढे जायचं असतं, आपलं काम करायचं असतं” असं उत्तर अजित पवार यांनी दिलं.
कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी ठरलेले कवडु भोयर आणि त्यांच्या पत्नी कुसुमबाई भोयरही उपस्थित होते. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं पवार दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. सत्कारावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सारिका भरणे, अजितदादांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांची उपस्थिती होती. (Ajit Pawar was asked when shall he get opportunity of Ashadhi Vitthal Mahapooja)
प्रताप सरनाईकांचे बिझनेस पार्टनर अमित चांदोळेंना ईडीकडून अटक, सलग 12 तास चौकशी
वाचा सविस्तर👉🏽 https://t.co/iSfQwHUA7r@PratapSarnaik @ShivSena @BJP4Maharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 26, 2020
यापुढे केंद्राच्या संमतीशिवाय राज्यांमध्ये लॉकडाऊन नाही; केंद्रीय गृह विभागाचे स्पष्ट निर्देश
वाचा सविस्तर- https://t.co/QUJFjm100j@AmitShah @BJP4Maharashtra @CMOMaharashtra #Lockdown3 #coronavirus— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 26, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’