शंभूराज देसाईंचा कामाचा धडाका; पाटण तालुक्यातील 155 विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई भूमिपूजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सकलेन मुलाणी | कराड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघातील साडे 35 कोटी रुपयाच्या 155 विकासकामांचा ई भूमिपूजन समारंभ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. आता ई उदघाटन झालेली कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण कशी होतील याकडे लक्ष ठेवा या कामांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लोकांचं समाधान व्हावे अशी सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पाटण तालुक्यातील या ई उद्घाटना च्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी मास्क लावल्याचं ऑनलाइन पाहून मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शाबासकी देत आभार मानले.

शंभूराज देसाई म्हणाले, या विकासमकामामध्ये विशेषतः गावाला जोडणारे रस्ते, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील काही रस्ते, मागासवर्गीय आणि दलित वस्त्यांमधील विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका अशा तीन का चार समारंभाचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले , शुभेच्छा दिल्या आणि डोंगरी भागातील ही कामे दर्जेदार व्हावी आणि लवकरात लवकर व्हावी आणि या कामांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लोकांचं समाधान व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

विकास कामांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले जाईल अशी ग्वाही दिली शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करून ही सर्व कामे दर्जेदार होतील आणि लवकर होतील याचा प्रयत्न करू अस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हंटल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment