‘ई-नाम’ ची अंमलबजावणी केव्हा? शेतकऱ्यांचा शासनाला सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । शेतमालाची देशभरातील आवक कळावी. सोबतच सर्व बाजार समित्या एकमेकांशी जोडल्या जाऊन एकच राष्ट्रीय बाजार निर्माण व्हावा. व्यापाऱ्यांना राज्याबाहेरील शेतमालाची ऑनलाईन व्यवहाराद्वारे खरेदी करता यावी. या उद्देशाने केंद्र सरकारने ‘ई-नाम’ ही महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणली. दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत योजना कार्यान्वित झालीये. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी अजूनही झाली नाही. त्यामुळं योजनेची अंमलबजावणी केव्हा होणार? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

या योजनेनुसार शेतमालाची नोंदणी समितीच्या प्रवेशद्वारावर होते. यावेळी त्याचा आधार क्रमांक, बँक अकाऊंट नंबर, अडत दुकानदार यांची नोंद होते. सौद्यात सहभागी होणार्‍या सर्व खरेदीदारांचे अकाऊंट नंबर व बँक गॅरंटी समितीकडून घेतले जातात. ‘ई-ऑक्शनद्वारे शेतमालाचे सौदे निघतात. सात मिनिटांत प्रतवारी पाहून ज्याची बोली जास्त त्या व्यापार्‍याला शेतमाल मिळतो.

सौद्याच्या चित्रीकरणामुळ सौद्यावेळी होणार्‍या गैरप्रकारांना आळा बसतो. शेतमालाची खरेदी झाल्यानंतर तत्काळ त्या खरेदीदाराच्या बँक खात्यातून पैसे शेतकर्‍याच्या बँक खात्यात जमा होतात. यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला केंद्र शासनाकडून वेब कॅमेरे, संगणक, प्रोजेक्शन टी. व्ही. यासह ३० लाख रुपयांचे साहित्य केंद्र शासनाकडून मिळाल होत. लिज लाईनही बसविण्यात आली होती. पण नेमकं या योजेनची अंमलबजाणी होणचं राहून गेलं.

Leave a Comment