हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही e-shram card योजनेशी संबंधित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. केंद्र आणि राज्य सरकारे ई-श्रम कार्डधारकांना अनेक फायदे देत आहेत. जर तुमच्याकडेही ई-श्रम कार्ड असेल तर हे लक्षात घ्या की यामध्ये रजिस्टर्ड असलेल्या लोकांना 500 रुपयांच्या आर्थिक मदतीशिवाय इतरही अनेक सुविधा मिळतील. ई-श्रम कार्डच्या मदतीने तुम्हांला आपले घर बांधण्याचे स्वप्न देखील पूर्ण करता येईल. चला तर मग याद्वारे कोणकोणते फायदे मिळतील ते जाणून घेउयात …
इन्शुरन्स कव्हर
जर तुमच्याकडे e-shram card असेल तर पीएम सुरक्षा विमा योजने अंतर्गत तुम्हांला 2 लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स कव्हर मिळेल. यामध्ये रजिस्टर्ड एखाद्या कामगाराचा अपघातात मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये मिळतील. जर व्यक्ती अपंग झाली तर त्याला 1 लाख रुपये मिळेल.
घर बांधण्यासाठी मदत
आपले स्वतःचे घर असावे असे प्रत्येकालाच वाटत असते. जर तुमच्याकडेe-shram card असेल तर या योजनेअंतर्गत तुम्हाला घर बांधण्यासाठी देखील पैसे दिले जातील. ई-श्रम कार्डधारकांना आता केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे.
त्याचबरोबर याद्वारे कामगार विभागाच्या मोफत सायकल, मोफत शिलाई मशीन, मुलांसाठी शिष्यवृत्ती, तुमच्या कामासाठी मोफत साधने इ.सारख्या सर्व योजनांचा लाभ देखील मिळणार आहे. तसेच भविष्यात त्याअंतर्गत रेशनकार्ड देखील जोडले जाईल. याद्वारे देशातील कोणत्याही रेशन दुकानातून रेशन घेता येईल. याशिवाय e-shram card धारकांच्या बँक खात्यात सरकारकडून दरमहा 500 – 1000 रुपये पाठवले जात आहेत.
ई-श्रम कार्डसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी या वेबसाईटला भेट द्या : https://eshram.gov.in/
हे पण वाचा :
Home Loan Rate Hike: होम लोन महागल्यानंतर जाणून घ्या आपल्याकडे कोणकोणते पर्याय असतील ???
Nexon EV Max : एका चार्जमध्ये 437 किमी धावणार Tata ची ‘ही’ गाडी, किंमत किती असेल ते पहा
Mukesh Ambani च नाही तर त्यांचे शेजारीही आहेत अब्जाधीश, त्यांच्या शेजारी कोण-कोण राहतात ते पहा
Google Play Store Policy : आजपासून ‘कॉल रेकॉर्डिंग’ चे सर्व App होणार बंद
JioPOS Lite App : Jio Recharge द्वारे घर बसल्या पैसे कमावण्याची संधी !!!