कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोयना परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. आज शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भूकंप झाला. कोयना धरण परिसरातील या भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल इतकी आहे. कोयना धरणाला भूकंपाच्या धक्क्याचा कोणताही धोका नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली आहे.

कोयना धरण व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 6.30 च्या दरम्यान कोयना परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा धक्का सौम्य स्वरूपाचा होता, तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येस पाच किलोमीटर अंतरावर होता.

Earthquake Koyna Dam

भूकंपाची तीव्रता 2. 8 रिश्टर स्केल होती. दरम्यान या भूकंपाची तीव्रता कमी असल्याने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाला या भूकंपापासून कोणताही धोका नसल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.