हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरीर स्वास्थ जपण्यासाठी विविध घटक महत्वाचे असतात. शरीराला कॅल्शियम, प्रोटीन्सची आवश्यकता असते. तसेच शरीर निरोगी राहण्यासाठी व्हिटामिन बी 12 चीही गरज असते. व्हिटामिन बी 12 मुळे शरीरात पोषक घटकांची कमतरता दूर होते. यामुळे रड ब्लड सेल्स तयार होतात. तांबड्या रक्तपेशींची गरज शरीराला असते. व्हिटामिनच्या कमतरतेमुळे शरीराला थकवा येणे, चक्कर येणे, भूक न लागणे, गॅस, अॅसिडीटी, त्वचा पिवळी पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे दिसून येतात. याचा मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
मेंदूचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी, शरीरात लाल पेशींची संख्या योग्य राहण्यासाठी, शरीरात उर्जा टिकवून ठेवण्यासाठी व्हिटामिन बी 12 ची गरज असते. शरीरात व्हिटामिन बी 12 जास्त प्रमाणात असल्यास शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. शरीरात व्हिटामिन बी 12 अभावी अॅनिमियाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हेल्थ लाइनच्या अहवालानुसार डेअरी प्रोडक्ट्स हा व्हिटामिन्स मिळवण्याचा चांगला पर्याय आहे. तसेच दही हा उपायही महत्वाचा आहे.
व्हिटामिन बी – 12 चा समावेश असलेले कोणते पदार्थ आहेत ?
दही –
फार्म इजि डॉट कॉममुसार 1 कप दह्यामध्ये 28 टक्के व्हिटामिन बी – 12 चा समावेश आहे. व्हिटामिन बी – 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी दही खाणे हा उत्तम पर्याय आहे. शरीरातील मांसपेशी आणि हाडांचे पोषण करण्यासाठी आणि हाडांच्या मजबुतीसाठी दररोज 1 वाटी दह्याचा समावेश करणे आवश्यक आहे.
न्युट्रीशनल यीस्ट –
फोर्टीफाईड यीस्टमध्ये जास्त प्रमाणात व्हिटामिन बी – 12 असते. 1 चमचा फोर्टीफाईड यीस्टमध्ये 2.4 व्हिटामिन बी – 12 असते.
रिच ब्रोकोली –
ब्रोकोलीमध्ये पोषक तत्व असतात. ब्रोकोलीमध्ये शरीरासाठी आवश्यक व्हिटामिन्स, कॅल्शियम आणि मिनरल्स असतात. हिवाळ्यात आहारात ब्रोकोलीचा वापर केल्यास तब्येत चांगली राहते.
ड्राय फ्रुट्स –
शरीरात व्हिटामिन बी – 12 ची कमतरता असल्यास नियमित ड्राय फ्रुट्सचे सेवन करणे महत्वाचे असते. बदामात व्हिटामिन्स,मिनरल्स, कॅल्शियम, लोह मोठ्या प्रमाणात असते. सफरचंद, टोमॅटो आणि केळी यांमुळे व्हिटामिन बी – 12 ची गरज पूर्ण होते.
ज्वारी, बाजरी इतर धान्य –
ज्वारी, बाजरी आणि गव्हामध्ये पोषक तत्वांचा खजिना आहे. या धान्यात प्रोटीन्स, फायबर्स आणि हेल्दी फॅट्सचे प्रमाण चांगले आढळते. यात व्हिटामिन्सचे प्रमाणही चांगले आहे. यामुळे शरीर निरोगी रहाते आणि थकव्याची समस्या बंद होते.