हिवाळ्यात आवळा खाल्ल्याने होतात जबरदस्त फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईनहिवाळा हा खाण्या-पिण्यासाठी उत्तम ऋतू मानला जातो. मात्र हिवाळ्यात सर्दी, ताप, खोकला असे आजारही होण्याची शक्यता असते. त्यामुळे या थंडीच्या कडाक्याच्या असे पदार्थ खायला हवे जे आपल्यासाठी आरोग्यदायी ठरू शकतात. आज आपण अशाच एका फळाबाबत वाचणार आहोत ज्याचे नाव आहे आवळा… होय हिवाळ्याच्या दिवसात आवळा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत …. चला जाणून घेऊया….

आवळा अँटिऑक्सिडेंट्स आणि पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहे. आयुर्वेद, चरक संहिता आणि सुश्रुत संहिता या दोन प्रमुख ग्रंथांत आवळाचे वर्णन ऊर्जावान औषधी वनस्पती म्हणूनही केले आहेत. याशिवाय आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, कार्बोहायड्रेट आणि फायबरचे गुणधर्म आढळतात. हिवाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात आवळ्याचा समावेश करून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता.

आवळा व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे, जे रक्त शुद्ध करून त्वचा सुधारण्यासाठी फायदेशीर आहे. हिवाळ्यात आवळा खाल्ल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार होते.

आवळ्याचा रस हळदीसोबत घेतला तर मधूमेह नियंत्रणात ठेवण्यास फायदा होतो.

अन्न पचवण्यासाठी, गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी आवळा फायदेशीर मानला जातो. आवळा तुम्ही चटणी, मुरंबा, लोणचे, रस किंवा पावडरच्या स्वरूपात वापरू शकता.

आवळ्याच्या सेवनाने दात आणि हिरड्यांना मजबुती मिळते तसेच श्वासातील दुर्गंधी सुद्धा कमी होते.