गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी आर आबा ग्रुपचा पर्यावरणपूरक जलकुंड

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मलकापूर नगरपरिषदेचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव यांच्या आर. आबा ग्रुपकडून गणेश विसर्जनासाठी मलकापूर व कराड शहरातील गणेश भक्तांसाठी मूर्ती विधीवत पूजन व विसर्जनासाठी जलकुंड तयार केले असून या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कराडच्या प्रितीसंगम घाटावर होणारी गर्दी टाळण्यासाठी मलकापुर येथील आर आबा ग्रुपचा पर्यावरण पुरक जलकुंडात गणेश विसर्जन उपक्रम राबविला आहे.

या उपक्रमात शेकडो गणेश मूर्तीचे विधीवत विसर्जन आर आबा ग्रुपकडून करण्यात आले. पर्यावरण पूरक पध्दतीने होणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी भरघोस प्रतिसाद देत असून कौतुक होत आहे. गणपती मूर्तीचे नदीला विसर्जन नसल्याने प्रदूषण टाळण्यास मदत होत आहे. तसेच निर्माल्यही या ग्रुपकडून गोळा करून घेतले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

You might also like