अर्थव्यवस्था तेजीत, ऍडव्हान्स टॅक्स 41 टक्क्यांनी तर डायरेक्ट टॅक्स 48 टक्क्यांनी वाढला

नवी दिल्ली । आर्थिक क्रियाकलापांना वेग आल्याने चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ऍडव्हान्स टॅक्स भरणामध्ये 41 टक्के वाढ झाली आहे. यासोबतच व्यक्ती आणि कंपन्यांच्या उत्पन्नातून नेट डायरेक्ट टॅक्स कलेक्शन 48 टक्क्यांहून जास्तीने वाढ झाली आहे. हा आकडा कोरोना महामारीमुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेत सतत सुधारणा दर्शवतो. तसेच, तो सरकारच्या सुधारित अंदाजापेक्षा जास्त आहे.

डायरेक्ट टॅक्स कलेक्शन 13.63 लाख कोटी होते
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 16 मार्च 2022 पर्यंत थेट कर संकलन 13.63 लाख कोटी रुपये होते. एका वर्षापूर्वी 2020-21 च्या याच कालावधीत ते 9.18 लाख कोटी रुपये होते. चालू आर्थिक वर्षातील नेट डायरेक्ट टॅक्स कलेक्शन 2019-20 मधील महामारीपूर्व 9.56 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 35 टक्के जास्त आहे. या कॅटेगिरीमध्ये वैयक्तिक उत्पन्नावरील टॅक्स, कंपन्यांच्या प्रॉफिटवर टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स तसेच वारसा आणि गिफ्ट टॅक्स यांचा समावेश आहे.

ऍडव्हान्स टॅक्स 6.62 लाख कोटींवर पोहोचला आहे
तसेच ऍडव्हान्स टॅक्स कलेक्शन 40.75 टक्क्यांनी वाढून 6.62 लाख कोटी रुपये झाले आहे. त्याचा चौथा हप्ता जमा करण्याची शेवटची तारीख 15 मार्च होती. टॅक्स कलेक्शन अपेक्षेपेक्षा चांगले झाल्याचे CBDT ने निवेदनात म्हटले आहे. यावरून कंपन्यांचे उत्पन्न वाढले असून त्या नवीन नोकऱ्या देत असल्याचे दिसून येते. कोविडनंतर अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याचे हे लक्षण आहे. यामुळे सरकारला आपली तूट नियंत्रणात ठेवण्यास मदत होईलच, मात्र रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढत्या खर्चातून सरकारी तिजोरीला दिलासा मिळेल.