एकनाथ खडसेंना ED ची नोटीस ; दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या ईडीच्यावतीने अनेक राजकीय नेत्यांवर कारवाई केली जात आहे. आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांनाही ईडीने समन्स बजावला. त्यानंतर आता ईडीने महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना नुकतीच एक नोटीस पाठवली आहे. खडसेंसह इतर चौघांनाही नोटीसा पाठवण्यात आल्या असून पीएमएलए अंतर्गत जप्त केलेल्या 11 मालमत्ता रिकाम्या करण्याबाबत नोटीसीद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

ईडीने एकनाथ खडसे यांना ही नोटीस मनी लाँडरिंग अंतर्गत बजावली असून मुंबई, नाशिक, पुणे, जळगाव, लोणावळा, सूरत येथील फ्लॅट्स, बंगले, भूखंड, जमिनी आदी ठिकाणी असलेल्या मालमत्ता रिकाम्या करण्याबाबत सांगितले आहे. खडसेंसह त्यांच्या पत्नी मंदाकिनी, गिरीश चौधरी, इन्शिया मुर्ताझा बादलावाला, उकानी आदी या सर्व मालमत्तांचे मालक आहेत. या सर्व मालमत्तांवर ईडीने पीएमएलए अॅक्ट अंतर्गत ऑगस्ट 2021 मध्ये टाच आणली होती.
दरम्यान, आता ईडीच्या वतीने काल 30 मे रोजी खडसेंना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

सदर नोटीस मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत संबंधित मालमत्ता रिकाम्या करण्यात याव्यात. तसे न झाल्यास कायदेशीररित्या या मालमत्ता रिकाम्या करण्याचा अधिकार ईडीकडे असेल, असे या नोटिशीत लिहले आहे. याशिवाय संबंधित मालमत्ता हस्तांतरण, विक्री, भाडेकरारावर देण्यास परवानगी दिली जाऊ नये, अशी माहिती नोटीशीमार्फत नोंदणी महानिरीक्षक तसेच नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव, सूरत येथील जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आलेली आहे.

Leave a Comment