नाना पटोलेंच्या वकीलावर ईडीची धाड; फडणवीसांविरोधातील याचिकेमुळे होते चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील अॅड. सतीश उके यांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू आहे. विशेष म्हणजे फोन टॅपिंग प्रकरणात सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील होते. त्यामुळे नागपुरात खळबळ उडाली आहे.

काही आठवड्यांपूर्वी एका साठ वर्षीय वृद्ध महिलेने अॅड. सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांना नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले होते. अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता मात्र ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. आज ईडीने टाकलेला छापा हा त्याच अनुषंगाने टाकला असू शकतो अशी चर्चा सुरू आहे. उकेंच्या घराबाहेर सीआरपीएफ जवान आणि पोलिसांचा बंदोबस्त पहायला मिळत आहे.

सतीश उके नाना पटोलेंचे वकील-
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दाखल केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात सतीश उके वकील आहेत. तसेच नाना पटोलेंचा गावगुंड ‘मोदी’ सतीश उके यांनीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन समोर आणला.नागपूरचे पोलीस आय़ुक्त यांच्याविरोधातही त्यांनी माहिती दिली होती. नाना पटोले यांनी नितीन गडकरींविरोधात केस दाखल केली आहे. या खटल्यात सतीश उके पटोलेंचे वकिल आहेत.