दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांचे शुल्क माफ; वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी टि्वट करीत केली आहे. “कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांकडून या वर्षी इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे शुल्क घेतले जाणार नसल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली आहे. “कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या या मुलांना दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारच्यावतीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, कोरोना काळात दीड वर्षात राज्यात लाखो जण बाधित झाले आहेत, तर मृत्यू झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे. कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना आधार देण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांचे दहावी व बारावीचे परीक्षा शुल्क घेतले जाणार नसल्याचे गायकवाड यांनी म्हंटले आहे.

दरम्यान कोरोनाच्या संकटात अनेक कुटुंबातील कमावत्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अशा कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी 50 हजार रुपये देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने आठ दिवसापूवी घेतला आहे.

You might also like