कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी बनविला रोबोट ; आठवीच्या विद्यार्थ्यांची अभिमानास्पद कामगिरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड :- रुग्णालयात दाखल तसेच होम कॉरंटाईन केलेल्या कोरोना रुग्णांपर्यंत गोळ्या-औषधे तसेच साहित्य पुरविण्या बरोबरच तेथील फरशीची साफसफाई करणारा अनोखा रोबोट सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडीच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या अथर्व चंद्रकांत पाटील या विद्यार्थ्याने बनविला आहे.

पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे हे अथर्वचे मुळगाव आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या तसेच होम कॉरंटाईन केलेल्या कोरोना रुग्णांपर्यंत गोळ्या-औषधे तसेच साहित्य पुरविण्या बरोबरच तेथील फरशीच्या साफसफाईवर येणारी मर्यादा लक्षात घेवून या कामासाठी अनोखा रोबोट बनवीण्याचा विचार अलीकडेच त्याच्या मनात आला.विज्ञान शिक्षक व रयत शिक्षण संस्थेचे आजीव सेवक डॉ.सुधीर कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी इन्स्पेक्टर मोहनराव कदम यांच्या प्रोत्साहनाने दोन आठवडे मेहनत घेवून त्याने हा रोबोट प्रत्यक्षात साकारला.त्यासाठी घरात पडून असलेल्या काही वस्तूंसह बाजारातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचाही त्याने वापर केला आहे.

हा रोबोट बेसला बसविलेल्या चाकांवरून इकडून तिकडे फिरतो.त्याच्या हातावर बसावंलेल्या ट्रे मधून औषधे, गोळ्या तसेच अन्य वस्तू रुग्णांपर्यंत पोहचवता येतात.शिवाय त्याला बसविलेल्या स्क्रबरने फरशीची साफसफाईही करता येते. रोबोटला बसविलेली बॅटरी चार तास चार्ज केल्यावर तो आठ तास कार्यरत राहतो. त्यावर बसविलेल्या वायफाय कनेक्ट कॅमेऱ्याव्दारे रुग्णांशी संवादा बरोबरच २० फुटांच्या अंतरात रिमोटच्या साह्याने रोबोट नियंत्रीतही करता येतो.रोबोट बनविण्यासाठी एक हजार रुपये खर्च आल्याचे अथर्व सांगतो.

रयत शिक्षण संस्थेच्या रयत विज्ञान प्रकल्पांतर्गत घेतलेल्या वैज्ञानिक खेळणी व उपकरण स्पर्धेत या रोबोटला संस्था पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला.अथर्वच्या यशाबद्दल प्राचार्य जी.जी साठे यांनी अथर्व व त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक डॉ.सुधीर कुंभार,तत्कालीन प्रभारी प्राचार्य एस.एस कदम व अन्य शिक्षक,कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment