Monday, March 20, 2023

सांगली जिल्ह्यामधील शिरगावात एकाच रात्रीत ८ ठिकाणी घरफोड्या

- Advertisement -

सांगली प्रतिनिधी । तासगाव तालुक्यातील शिरगाव येथे बंद असलेली सात घरे व एक दूध डेअरी अशा आठ ठिकाणी एका रात्रीत घरफोड्या झाल्या आहेत. या घरफोडीत एका रिव्हॉल्वर चोरीसोबत मोठ्या रकमेवर चोरट्यानी डल्ला मारला आहे. या घरफोडीबाबत तासगाव पोलिसात ५० हजार रुपयांचे रिव्हॉल्वर चोरीला गेल्याची तक्रार जितेंद्र पाटील यांनी दिली. असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सांगली येथील श्र्वान पथकाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू होता.

पोलिसांना दिलेल्या माहितीत पाटील यांनी सांगितले रात्री ९ ते पहाटे ६ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून त्यांनी आमच्या घरात प्रवेश केला. बेडरूम मधून कपाटातील ५० हजार रुपये किमतीचे रिव्हॉल्वर त्यांनी पळवले आहे. मात्र चोरट्यानी आठ घरांसह एक दूध डेअरी ही फोडली आहे. मात्र त्यातून नेमकी किती रक्कम चोरट्यानी पळवली याबाबत समजू शकले नाही. गेल्या आठवड्यातच शिरगाव बस स्टँड जवळील एक ज्वेलर्स ही चोरट्यांनी फोडले होते. व गुरुवारच्या या घरफोडयांच्या प्रकाराने शिरगावात एकाच खळबळ उडाली असून गावात घबराटीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांसह सांगली येथील श्र्वान पथकाने धाव घेत तपास सुरू केला.

- Advertisement -

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास NIAकडे देण्याचा केंद्राचा निर्णय असंवैधानिक – बाळासाहेब थोरात

असे बनले भारताचे संविधान…

सरकारने मनमानीपणे कर लादणं हा सुद्धा सामाजिक अन्याय- सरन्यायाधीश बोबडे