‘राज्यात काहीही होऊ शकतं’, राज्याच्या राजकारणावर एकनाथ खडसे यांचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादमध्ये भाषण करताना मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. यावरून आता विरोधकांनी देखील त्याच मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यादरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मध्यावधी निवडणुकीबाबत महत्त्वाचं विधान केले आहे. सध्या महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय घडामोडी पाहता राज्यात काहीही होऊ शकतं, असे वक्तव्य एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे?
“राज्यात काहीही होऊ शकतं. आतापर्यंत राज्यातील राजकारण पाहिलं तर सरकार बदलले, काही सरकार खोक्यांमुळे बदललं तर काही असंच बदललं, असे चित्र अनुभवात येतंय. त्यामुळे नेमकं काय होईल, याचा अंदाज आता घेणं अवघड आहे”, असे एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले आहेत.

तसेच काही दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्यावेळेस फार मोजक्याच लोकांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, इतरांना मिळणार नाही. यानंतर नाराज झालेले आमदार मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे बंडखोरी करण्याची शक्यता आहे. आमदारांमध्ये अस्वस्थता बाहेर येण्याची शक्यता आहे”, असा दावादेखील एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी यावेळी केला.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!