एकनाथ शिंदेंची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी; उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेविरोधात बंडखोरी करून भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी कारवाई केली आहे. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे.

काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत आघाडी न करता भाजपसोबत युती करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. शिंदेंच्या या भूमिकेला 39 शिवसेना आमदार आणि काही अपक्षांनी साथ दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. यामुळे पक्षविरोधी कारवाई केल्याचा उल्लेख शिवसेनेनं शिंदेंची हकालपट्टी केली आहे.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला कुणालाही पक्षातून काढून टाकण्याचा अधिकार आहे. या कार्यकारिणीत सध्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी (दिवंगत), लिलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत, गजानन किर्तीकर हे नेते आहेत.

Leave a Comment