एकनाथ शिंदेंचा गडचिरोली दौरा; सुरजागड खाणी विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने नागरिकांत नाराजी

गडचिरोली : जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी भामरागड तालुक्यातील दोदराज येथील पोलिस ठाण्याला भेट दिली. तसेच हत्तींकरता सुरक्षित वनक्षेत्र कसे उभारता येईल याचाही आढावा घेतला. पालकमंत्र्यांनी आजच्या दौर्‍यावेळी सुरजागड खाणी विरोधात सुरु असलेल्या जनआंदोलनाकडे मात्र पाठ फिरवली. यामुळे जिल्ह्यातील आदिवासींमध्ये नाराजीचा सूर आहे. 10 हजार आदिवासींनी एटापल्लीत सुरजागड विरोधात मोर्चा काढूनही त्याची दखल न घेतल्याने पालकमंत्र्यांवर ग्रामसभांकडून टीका होत आहे.

पालकमंत्री शिदे यांनी दौर्‍यादरम्यान गडचिरोली जिल्ह्यांतील बेरोजगार युवकांना रोजगाराचे व्यावसायिक प्रशिक्षण देवुन आत्मनिर्भर करणेकरीता व लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आलेल्या आत्मसमीत नक्षल सदस्यांचे पुनर्वसन करुन त्याचे जीवनमान उंचावण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल यांच्या संकल्पनेतुन गडचिरोली पोलीस दलाच्या “पोलीस दादालोक खिडकी” च्या माध्यमातुन विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने प्रोजेक्ट कृषीसमृध्दी
योजनेअंतर्गत मत्स्यपालन तसेच आधुनिक पध्दतीने भाजीपाला व फळबाग लागवड प्रशिक्षण पुर्ण केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप तसेच टु व्हिलर/फोर व्हिलर प्रशिक्षण पुर्ण केलेल्या उमेदवारांना ड्रायव्हिंग लायसन्स वाटप, आत्मसमीत नक्षल सदस्यांना सदनिका (भुखंड) वाटप, कोरोना काळात अनाथ झालेल्या १३ बालकांना प्रत्येकी ५ लाख रुपये मुदत ठेव, प्रमाणपत्र व सत्कार समारंभ कार्यक्रम दिनांक ३०/१०/२०२१ रोजी पोलीस मुख्यालयातील ‘एकलव्य धाम’ येथे पार पाडण्यात आला.

प्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री. एकनाथ शिंदे, नगर विकास,सार्वजनिक बांधकाम (सार्व.उपक्रम) मंत्री, म.रा. तथा पालकमंत्री, गडचिरोली जिल्हा, मा.श्री. अशोक नेते, खासदार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र, मा.श्री. देवराव होळी, आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र, मा.श्री. कृष्णा गजबे, आरमोरी विधानसभा क्षेत्र, मा. श्री. अजय कंकडालवार, अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली तसेच मा.श्री. संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक उपस्थित होते.

तसेच मा.जिल्हाधिकारी श्री. संजय मीना सा., मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. कुमार आशिर्वाद सा.,मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा., मा.अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. अनुज तारे सा., मा. पोलीस उपअधीक्षक (अभियान) श्री भाऊसाहेब ढोले सा., उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली मा.श्री. प्रणिल गिल्डा सा. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली तथा प्रकल्प संचालक, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा)गडचिरोली मा. श्री संदीप कराडे, एलडीएम.बीओ.१ गडचिरोली श्री. युवराज टेंभुणे, बीओआय
आरसेटीचे संचालक मा. श्री चेतन वैद्य, जिल्हा महीला व बालविकास अधिकारी श्री. प्रकाश भांदककर,कार्यक्रम समन्वयक मा. श्री. हेमंत मेश्राम, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन आणि दुग्ध शास्त्र) डॉ. विक्रम
कदम, कमल केशव ड्रायव्हिंग स्कुल गडचिरोली श्री. निलेश बांबोळे, कृषी विशेष तज्ञ (अभियांत्रिकी)श्री. ज्ञानेश्वर ताथोड, कार्यक्रम समन्वयक व जिल्हा माहीती अधिकारी श्री. सचिन अडसुळ हे उपस्थित होते.

You might also like