अजित पवारांना दणका : मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्याचं कामकाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहिलं जात आहे. अजून मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने विभागांना मंत्री मिळालेले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंकडून विकासकामांच्या बाबतीत निर्णय घेतले जात आहेत. त्यांनी नुकताच एक निर्णय घेतला असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दणका दिला आहे. शिंदे यांनी मार्च ते जून 2022 मध्ये बारामतीत मंजूर झालेल्या नगरविकास विभागाच्या 941 कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी एकीकडे बारामतीतील कामांना स्थगिती दिली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांनी सुचवलेल्या कामांना मात्र अभय दिले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार निधी देत नाहीत, अशी तक्रार अनेक आमदारांनी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंकडून सत्तेत आल्यावर पवारांनी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली जात आहे.

दरम्यान, अजित पवार उपमुख्यमंत्री असताना 941 कोटींपैकी एकट्या बारामती नगरपरिषदेला 245 कोटींचे वितरण करण्यात आले होते. मात्र, आता बारामतीतील कामांना स्थगिती मिळाल्याने हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Leave a Comment