पाठीत खंजीर कुणी खुपसला हे योग्य वेळी सांगेन; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जळजळीत टीका केली. तुम्ही मर्द नव्हे तर दरोडेखोर आहात. हिंमत असेल तर स्वतःच्या आई वडिलांच्या नावाने मते मागा अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला. त्यांनतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्त्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करु नये, असा टोला शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला .

एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब हे आम्हाला कुटुंबप्रमुखाप्रमाणे होते. ते आमच्या वडिलांसारखेच होते. हे सरकार अडीच वर्षापूर्वीच स्थापन व्हायला पाहिजे होते. त्याची दुरुस्ती आता आम्ही केलीय. निवडणुकपूर्व युती केली होती. त्यावेळेस शिवसेना-भाजपा युतीचे सरकार अडीच वर्षांपूर्वीच स्थापन करायला पाहिजे होतं. मात्र दुर्देवाने जे झालं नाही ती दुरुस्ती आता आम्ही केलीय. सारखं खंजीर खुपसल्यची भाषा केली जाते, मी त्यावर बोलू शकतो की जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकले त्यांनी खंजीरची भाषा करु नये. पाठीत खंजीर कुणी खुपसला हे मी योग्य वेळ आली की सांगेन, असा इशारा शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले-

शिवडी येथील शिवसेना शाखेच्या उद्घाटनावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. ही बंडखोरी नव्हे तर हरामखोरी आहे. तुम्ही मर्द नव्हे दरोडेखोर आहात. तुमच्यात हिंमत असेल तर शिवसेना प्रमुखांचा, माझ्या वडिलांचा फोटो लावू नका, तुमच्या हिंमतीवर मतं मिळवा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी घणाघाती टीका केली.